PostImage

Zadipatti VC News and Business

Aug. 12, 2024   

PostImage

एक लक्ष्य, एक विचार’ या भावनेने कार्य करा - ना. …


 

*बल्लारपूर शहर व ग्रामीण भाजपा संमेलन* 

*चंद्रपूर, दि.१२- देशातील जनतेची दिशाभूल करणे, संविधान धोक्यात असल्याचा कांगावा करणे आणि जातीजातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे राजकारण काँग्रेसने केले. लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुकीच्या प्रचाराला चोख उत्तर द्या. आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे एक लक्ष्य, एक विचार पुढे ठेवून कार्य करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*

बल्लारपूर शहरातील एकदंत लॉन येथे बल्लारपूर शहर आणि ग्रामीणमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे संमेलन रविवारी (ता.११) पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,लखनसिंह चंदेल,काशी सिंह, मनीष पांडे, निलेश खरबडे, समीर केणे, रणंजय सिंग, शिवचंद द्विवेदी, रेणुका दुधे, वैशाली जोशी, आशीष देवतळे, राजू दारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

'संगठन गढ़े चलो, सुपंथ पर बढ़े चलो, भला हो जिसमें देश का, वो काम सब किए चलो' या ब्रीदनुसार कामं करायचे आहे. खुर्ची प्राप्त करणे हे आपले ध्येय नाही. भाजपाचा कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे देशाच्या विकासासाठी काम करतो. तीच भावना कायम ठेवून येत्या काळात ‘बी फॉर भारत’, ‘बी फॉर बल्लारपूर’, ‘बी फॉर बीजेपी’ याच तत्त्वाने काम करा.’ ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा अनेक योजनांतून महाराष्ट्रातील महायुती सरकारने राज्यातील महिला, युवा आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. देशात सर्वाधिक पीक विमा चंद्रपूर जिल्ह्यात झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. 

संविधानाचा खोटा प्रचार आणि अनुसूचित जाती-जमातीच्या बांधवांची काँग्रेसने केलेली दिशाभूल ही देखील लोकसभेतील पराभवाची कारणे आहेत. भाजपा दलितविरोधी असल्याचा अपप्रचार काँग्रेसने केला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्वत: काँग्रेसचा विरोध करायचे. ‘काँग्रेस हे जळते घर आहे. जो यात जाईल तो भस्म होईल,’ असे ते म्हणायचे. त्याच बाबासाहेबांचे नाव वापरून काँग्रेसने खोटा प्रचार केला आणि समाजाची दिशाभूल केली. खरे वास्तव पुढे आणण्यासाठी जनतेत जाऊन त्यांना वास्तवाची जाणीव करून देण्याची गरज आहे. आज काँग्रेस जातीजातीत तेढ निर्माण करण्याचे काम करीत आहे. अशात आपले नाव आग लावणाऱ्यांत नाही तर आग विझविणाऱ्यांत घेतले जावे, याच हेतून आणि पवित्र उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून काम करण्याचे आवाहन देखील ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना केले. सोशल मीडिया हे आजच्या युगातील मोठे अस्त्र,शस्त्र आहे. त्याचा उपयोग योग्यप्रकारे करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य शासनाने ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले आहे. या अभियानाचे योग्य नियोजन करावे. आणि जास्तीत जास्त नागरिकांना अभियानात सामील करून घ्या, असे आवाहन ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.


PostImage

JAWED PATHAN

Jan. 2, 2024   

PostImage

अंगणवाडी सेविकेचा अप्पर जिल्हाधिकारी व बाल विकास प्रकल्प कार्यालयावर धडकणार …


 

चिमूर - महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी सभा चे कार्याध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या नेतृत्वात बुधवार दिनांक ३ जानेवारी दुपारी एक वाजता मानधन वाढ पेंशन नविन मोबाईल रिचार्ज रक्कम वाढविने सेवा निवृत्तीची एक रकमी रक्कम त्वरीत देण्यात यावी वैद्यकीय रजा मंजुर करण्यात बचतगटाची आहार पुरवठा व समृध्दी आहाराची रक्कम वाढविण्यात यावी  व इतर मागन्यासाठी हुतात्मा स्मारक येथुन निघून अंगणवाडी सेविकेचा मोर्चा थेट चिमूर बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयावर धडकणार आहे
गेली ४८ वर्षे कशाची ही तमा न बाळगता अविरत सेवा देनाऱ्या सरकारच्या प्रत्येक कार्यात सहभाग घेनाऱ्या अंगणवाडी सेविका महागाईने भरडल्या आहेत त्यांच्या कडे कोनी लक्ष दयायला तयार नाहीत त्यामुळे बुधवार ला निराश अंगणवाडी कर्मचारी यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार विरोधात विवीध मागण्यासाठी मोर्चा आयोजीत केला आहे.
सदर मोर्च्यात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व बचत गट प्रतिनिधींनी सहभागी व्हावे असे आवाहन माधुरी रमेश विर चिमुर प्रभा विश्वनाथ चामटकर नागभीड लता राजु देवगडे भद्रावती ललीता सोनुले मुल विद्या वारजुकर ब्रम्हपुरी संयोगिता गेडाम सिंदेवाही अन्नपुर्णा हिरादेवे वरोरा, रोशनी चंदेलअध्यक्ष चिमुर तालुका बचत गट आहार पुरवठा संघटना  यांनी केले आहे.


PostImage

pran

Dec. 4, 2023   

PostImage

चंद्रपूर येथील दीक्षाभूमिच्या विकासाकरिता उच्च अधिकार समितीची 56 कोटी 90 …


 

चंद्रपूर:- चंद्रपूरातील पवित्र दीक्षाभूमीचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहे. यात त्यांना यश येत असून दीक्षाभूमीच्या विकासासाठी उच्च अधिकार समितीच्या वतीने 56 कोटी 90 लक्ष रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला असुन आता सदर कामाचा प्रस्ताव अंतिम टप्यात आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी जगात नागपूर आणि चंद्रपूर अशा दोनच ठिकाणी बौद्ध धम्माची दिक्षा दिली. नागपूर येथील दीक्षाभूमीचा विकास झालेला आहे. मात्र चंद्रपूर येथील दीक्षाभूमी अविकसित राहिली आहे. येथे देशभरातुन येणाऱ्या अनुयायांसाठी कसल्याही सोयीसुविधा उपलब्ध नाही. परिणामी येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होत आहे. त्या अनुषंगाने दीक्षाभूमीच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार प्रयत्नशील आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी पहिल्याच हिवाळी अधिवेशनात दीक्षाभूमीच्या विकासासाठी एकत्रित १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी विधानसभेत केली होती. त्यानंतर त्यांनी दीक्षाभूमी समितीचे पदाधिकारी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर सत्ता परिवर्तन झाल्यावर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही सदर मागणीचा पाठपूरावा सुरु ठेवला होता. अखेर त्यांच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूर येथील दिक्षाभुमीच्या विकासासंदर्भात घोषणा केली होती.

दरम्यान त्या अनुषंगाने चंद्रपूरच्या दिक्षाभुमी विकासासाठी उच्च अधिकार समितीच्या वतीने 56 कोटी 90 लक्ष रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून सदर प्रस्ताव वित्त व नियोजन विभागाकडे अंतिम मान्यतेकरिता पाठविला आहे. सदर प्रस्तावित निधी वित्त विभागाकडून मंजूर करत कामाला प्रशासकिय मान्यता देण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

 

 

 

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या वतीने आमदार जोरगेवार यांचे अभिनंदन*

 

दीक्षाभूमीच्या विकासकामाचा पाठपूरावा करुन पवित्र दीक्षाभूमीच्या विकासाचे काम पूर्णत्वाकडे नेत असल्या बदल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिका-यांनी आज सोमवारी जनसंपर्क कार्यालयात आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही चंद्रपूरच्या पवित्र दिक्षाभुमीच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे म्हटले आहे. यावेळी डॉ. बाबा साहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक , सहसचिव कुणाल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, उपप्राचार्य डॉ. संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के, प्रा. दिलीप रामटेके आदींची उपस्थिती होती.